प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव अधिवेशनाला उपस्थित असलेले गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी सोमवारी सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांसोबत बैठक घेतली. बेळगाव येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी करण्यात आलेल्या सुरक्षा उपायांची माहिती मंत्रीमहोदयांना देण्यात आली.
यावेळी सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव रजनीश गोयल, कायदा व सुव्यवस्था विभागाचे एडीजीपी प्रताप रेड्डी, सतीश कुमार, आयजी बेळगाव सर्कल आणि बेळगावचे पोलीस आयुक्त त्यागराज हे देखील उपस्थित होते.









