राजीव गांधी कला मंदिरच्या स्व.रविंद्र लक्ष्मण नाईक स्मृतिप्रित्यर्थ : डिचोलीचे ‘रणांगण’ द्वितीय तर पेडणे येथील ‘ही श्रीची ईच्छा’ तृतीय

प्रतिनिधी /फोंडा
राजीव गांधी कला मंदिरतर्फे स्व. रविंद्र लक्ष्मण नाईक स्मृतीप्रित्यर्थ आयोजित दुसरी अखिल गोवा ऐतिहासिक नाटय़स्पर्धेचे प्रथम पारितोषिक हळर्ण येथील ओम कला सांस्कृतिक केंद्राच्या ‘युद्ध नको मज बुद्ध हवा’ नाटय़प्रयोगाला रू. 50 हजारांचे रोख पारितोषिक प्राप्त झाले आहे. ऐतिहासिक नाटय़स्पर्धेचा निकाल काल सोमवारी राजीव कला मंदिर येथे जाहीर करण्यात आला. यावेळी कला मंदिरचे सुनिल केरकर, महादेव सावंत, श्रीकांत गावडे व किर्ती उमर्ये उपस्थित होते.
स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक कला उन्मेश डिचोलीच्या ‘रणांगण’ या नाटय़प्रयोगाला तर तृतीय पारितोषिक वारखंड पेडणे येथील श्री शांतादुर्गा सांस्कृति व क्रिडा संघाच्या ‘ही श्रीची इच्छा’ यांना प्राप्त झाले. त्य़ांना रू. 45 हजार व रू. 35 हजार अनुक्रमे अशी पारितोषिके प्राप्त झाली. श्री ओंकार थिएटर पेडणे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, मांगिरीश युथ क्लब मंगेशी ‘टिळक आणि आगरकर’, बाळसती नाटय़ कलासंघ सुकतळी धारबांदोडा ‘स्वामी’ यांना रू. 30 हजार, रू. 25 हजार व रू. 20 हजार अशी उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी प्रथम-निलेश नाईक युद्ध नको मज बुद्ध हवा, द्वितीय नरेश आनंद कडकडे-रणांगण कला उन्मेश डिचोली, तृतीय प्रदीप राजाराम परब-ही श्रीची इच्छा शांतादुर्गा सांस्कृतिक व क्रीडा संघ वारखंड यांना प्राप्त झाले.
उत्कृष्ट अभिनय पुरूष भूमिकेसाठी प्रथम दिलीप महाले (शिवाजी-महाराज रायगडाला जेव्हा जाग येते), द्वितीय राज परब (अशोक-युद्ध नको मज बुद्ध हवा), तृतीय विजय बाबलो परब-माधवराव ही श्रीची इच्छा, स्त्री भूमिकेसाठी प्रथम शर्मिला विश्वास नाईक(जिजाबाई-तुझा तू वाढवी राजा मांगिरीश कला मंच), द्वितीय कु.सिंथीया गावकर (रमाबाई -ही श्रीची इच्छा), तृतीय कु. साईली शेट वेरेकर (आनंदीबाई -स्वामी श्री बाळसती नाटय़ संघ धारबांदोडा) यांना वैयक्तिक पारितोषिके प्राप्त झाली.
उत्कृष्ट नेपथ्य प्रथम आत्माराम परब-युद्ध नको मज बुद्ध हवा, द्वितीय कार्तिक घैसास व प्रतिक च्याराöटिळक आणि आगरकर, उत्कृष्ट प्रकाश योजना प्रथम संतोष शेटकर-रणांगण कला उन्मेश डिचोली, द्वितीय रजत कारबोटकर-युद्ध नको मज बुद्ध हवा. उत्कृष्ट ध्वनी संकलन निलेश मोहन नाईक युद्ध नको मज बुद्ध हवा, द्वितीय जवाहर बर्वेöरणांगण कला उन्मेश डिचोली. उत्कृष्ट वेशभूषा रोशन परब युद्ध नको मज बुद्ध हवा, द्वितीय चंद्रशेखर बर्वे ही श्रीची इच्छा, उत्कृष्ट रंगभूषा जितेंद्र परब रणांगण, सार्थक परब-ही श्रीची इच्छा, उत्कृष्ट बालकलाकार कु. अंश ज्ञा. सुभाजी öरायगडाला जेव्हा जाग येते, कु. समर्थ सुनिल मिसा-नेकजात मराठा. उत्कृष्ट लेखक नवीन नाटकासाठी प्रथम ध्रुव कुडाळकर-अंबरात फुले फुलली नट शारदा क्रिएशन म्हार्देळ गोवा यांना पारितोषिके प्राप्त झाली.
स्पर्धेचे परिक्षण मधुकर जोशी, गुरूदास बाबलो गाड व चतुरा विश्वास रायकर यांनी केले.









