हल्ल्यात नऊ मेंढ्या फस्त तर अकरा मेंढ्या जखमी
वार्ताहर / प्रयाग चिखली
केर्ली ता. करवीर येथील विठ्ठल कुंडलिक माने या शेळ्या-मेंढ्यांच्या कळपावर जंगली कोल्ह्यानी रविवारी मध्यरात्री हल्ला करून कळपातील ९ शेळ्यामेंढ्या फस्त केल्या. तर अकरा शेळ्या-मेंढ्यांना मोठ्या जखमा केल्यामुळे विठ्ठल माने या मेंढपाळ्याचे सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले. ही घटना रजपूतवाडी येथील किशाबापू बंगला परिसरात रविवारी मध्यरात्री बारा ते दोन सुमारास घडली. दरम्यान घटनास्थळी सीए येथील वनकर्मचारी संदीप हजारे आणि कृष्णात दळवी यांच्या उपस्थितीत पंचनामा केला.
केर्ली येथे राहणारे विठ्ठल माने यांच्या 30 शेळ्या मेंढ्या आहेत रविवारी त्यांच्या शेळ्यामेंढ्या रजपूतवाडी येथील किशा बापू बंगला परिसरात वस्तीला होत्या रविवारी मध्यरात्री माने यांच्या शेळ्या मेंढ्या कळपावर जंगली कोल्ह्यांच्या समूहाने हल्ला केला. यावेळी विठ्ठल माने झोपले होते. रात्री बारा ते दोन या काळात कोल्ह्यांनी नऊ शेळ्या-मेंढ्यांना फस्त केल्या तर अकरा मेंढ्यांवर हल्ला केल्यामुळे त्यांना मोठ्या जखमा झाल्या आहेत. दोन वाजता शेळ्या-मेंढ्या यांनी केलेला आवाजामुळे विठ्ठल माने जागे झाले. त्यावेळी त्यांनी आरडाओरडा करुन कोल्यांचा कळप हुसकावून लावला.
यावेळी नऊ शेळ्यामेंढ्या कोल्ह्यांच्या भक्षस्थानी पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेमुळे विठ्ठल माने यांचे सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले आहे दरम्यान सोमवारी सकाळी घटनास्थळी वनकर्मचारी संदीप हजारे कृष्णात दळवी यांच्यासह केली च्या सरपंच सौ बाबासाहेब चौगले पोलीस पाटील- तृप्ती जगताप पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा मिंड यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक संजय वाघमारे सरचिटणीस राज कोळेकर यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.. दरम्यान मोठ्या कष्टाने रात्रंदिवस राबून शेळ्या-मेंढ्यांचा व्यवसाय करणाऱ्या विठ्ठल माने त्यांच्या व्यवसायाचे मोठे नुकसान झाले असून या घटनेमुळे विठ्ठल माने दिवसभर घटनास्थळी हाताशी होऊन बसले असल्याचे चित्र पहावयास मिळाले.









