काबूल
अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा अल-कायदा आपले पाय पसरवू पहात असल्याची माहिती अमेरिकेने नुकतीच दिली आहे. अमेरिकेचे सैन्याने ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानमधून माघार घेतल्यानंतर अल कायदा या अतिरेक्मयांची संख्या अफगाणिस्तानात वाढत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. ही बाब देशातील शांततेच्या दृष्टीने काळजी वाढवणारी असल्याचे अमेरिकन यंत्रणेने म्हटले आहे. देशातील तालिबानच्या नेत्यांमध्ये मात्र या बाबतीत एकमत होताना दिसत नाही. अमेरिकन सैन्य आणि गुप्तचर एजन्सीने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर अलकायदा या अतिरेकी संघटनेच्या समूहाने पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये पाय पसरायला सुरुवात केली आहे. अमेरिका आणि त्यांच्या गुप्तचर एजन्सीने तेथून माघार घेतल्याने अलकायद्याच्या अतिरेक्यांच्या हालचालींवर नजर कोण ठेवणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 11 सप्टेंबर 2001 मध्ये अमेरिकेत झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये अलकायदाचा प्रामुख्याने हात होता. त्यानंतर अमेरिकेने या 20 वर्षांमध्ये अफगाणिस्तानातील अलकायदा अतिरेक्मयांविरुद्ध कठोर कारवाईचे नेतृत्व हाती घेतले होते.









