क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
महाबळेश्वर नगर येथील बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटना आयोजित जिल्हास्तरिय शटल बॅडमिंटन स्पर्धेला मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला.
जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उत्तर विभागाचे पोलीस महासंचालक सतिशकुमार, बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे सचिव अशोक पाटील, अभय हरदी, हुन्नूरगेकर, आनंद हावण्णावर, जे. एस. मंतेरो आदी उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत अशोक पाटील यांनी केले. पाहुण्यांच्या व खेळाडुंच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. आयजीपी सतिशकुमार यांनी नेटला पुष्पहार घालुन स्पर्धेला सुरुवात करून दिली. या स्पर्धेत 225 हून अधिक बॅडमिंटनपटुंनीभाग घेतला आहे. रविवार दि. 12 रोजी सायंकाळी अंतिम सामने खेळविण्यात येणार असून त्यानंतर बक्षिस वितरण होईल.









