250 कोटींच्या बनावट खरेदीचा पर्दाफाश
@ कोलकाता / वृत्तसंस्था
प्राप्तिकर विभागाने (आयटी) पश्चिम बंगालमधील विविध भागात शुक्रवारी छापे टाकले. यादरम्यान सुमारे 250 कोटी रुपयांच्या खरेदीत फसवणूक झाल्याची माहिती अधिकाऱयांनी पुढे आणली आहे. या कारवाईवेळी शोधमोहीम राबवताना विविध कागदपत्रे आणि मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. रिफाइन्ड लीड, लीड ऍलॉय आणि लीड ऑक्साईडच्या दोन प्रमुख उत्पादक आणि पुरवठादारांविरुद्ध 7 डिसेंबरपासून ही शोधमोहीम सुरू केली होती. या कारवाईत 53 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर 4 बँक लॉकर्सची चौकशी सुरू असल्याची माहिती सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या (सीबीडीटी) अधिकाऱयांनी दिली.









