शिरोळ : प्रतिनिधी
नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे महिला भाविकांची २ लाख रुपये किंमतीचे दागिने चोरीला गेल्याची फिर्याद भारती सुभाष दाभोळे (रा. शाहूनगर जयसिंगपूर) यांनी शिरोळ पोलिस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, नृसिंहवाडी येथे बुधवारी श्री स्वामी समर्थांचे पालखीचे ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या बबीता बलवान (रा. कुरूंदवाड) ,जनाबाई जानकर (भोर, जि. पुणे), श्रध्दा तोडकर (रा. बुधवार पेठ, कराड) या महिलांच्या गळ्यातील अंदाजे पाच ते आठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबविले. गर्दीचा फायदा घेवून दरम्यान पोलिसांनी दोघा संशयीतांना ताब्यात घेतल्याचे समजते.