मुंबई
नव्या ओमिक्रॉन विषाणूच्या चिंतेच्या सावटाखाली सोमवारपासून रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक सुरू झाली असून रेपो रेट जैसे थे राहणार असल्याचे संकेत व्यक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात व्याजदर वाढणार नसल्याची शक्यता दिसत आहे.
सोमवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीची बैठक सुरू झाली. या बैठकीत होणाऱया चर्चेअंती व्याजदराबाबतचा निर्णय 8 डिसेंबरला जाहीर केला जाणार आहे. रेपो दरात कोणताही बदल केला जाणार नाही असेच तज्ञांना वाटत आहे. अर्थव्यवस्थेची वाटचाल, ओमिक्रॉन विषाणूचा प्रसार, महागाई या साऱया बाबींचा विचार बैठकीत केला जाणार आहे.









