रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे बऱयाच दिवसांपासून चर्चेत आहेत. याआधी दोघे डिसेंबर 2021 मध्ये लग्न करणार असल्याचे वृत्त होते. त्यानंतर त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले आणि दोघे एप्रिल 2022 मध्ये करणार असल्याचे सांगण्यात आले होते. आता बातम्या येत आहेत की, रणबीर-आलियाने त्यांच्या लग्ननाची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे आणि आता ते डिसेंबर 2022 मध्ये लग्न करणार आहेत. तब्बल वर्षभरासाठी रणबीर-आलियाने त्यांचे लग्न पुढे ढकलले आहे. दोघांकडे सध्या इतके काम आहे की त्यांच्याकडे वर्षभर लग्नासाठी वेळ नाही. दोघेही डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करत आहेत, जे भारताबाहेर असेल. अशा परिस्थितीत, त्याची तयारी आणि लग्नासाठी बराच वेळ लागेल. रणबीर-आलिया लग्नाआधी आणि नंतरही दीर्घ सुट्टीवर जाणार असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या वर्षी एका मुलाखतीत रणबीर कपूरने सांगितले होते की, जर कोरोना आला नसता, तर त्याने 2020 मध्येच आलियाशी लग्न केले असते. लग्नाची तारीख लवकरच निश्चित करायची आहे, असेही त्याने सांगितले होते. आता लग्नाच्या तारखेची अधिकृत घोषणा कधी होणार हे पाहायचे आहे. रणबीर-आलिया मुंबईत त्यांचे नवीन घर बांधत आहेत, जिथे ते लग्नानंतर एकत्र राहणार आहेत. या दोघांच्या घरात सर्व लक्झरी सुविधा असतील रणबीर आणि आलियाचे लग्न हे ऋषी कपूर यांचे स्वप्न असल्याचेही सांगितले जाते.









