खासबाग येथील रहिवाशाला अटक
प्रतिनिधी /बेळगाव
कणकुंबी तपास नाक्मयाजवळ शुक्रवारी सकाळी अबकारी अधिकाऱयांनी बेकायदा गोवा बनावटीची दारू जप्त केली. याप्रकरणी खासबाग येथील रहिवाशाला अटक करण्यात आली असून 7 लाख 75 हजार 139 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दत्तात्रय हणमंत खानापुरे (वय 55, रा. वड्डरचाळ, खासबाग) असे अटक करण्यात आलेल्या वाहनचालकाचे नाव आहे. केए 22 बी 5685 क्रमांकाच्या आयशर वाहनातून 180 बॉक्स (1557.316 लिटर) गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करण्यात येत होती. अधिकाऱयांनी वाहनांसह दारूसाठा जप्त केला आहे.
वरिष्ट अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी निरीक्षक मंजुनाथ गलगली व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. कणकुंबी तपास नाक्मयाजवळ वाहनांची तपासणी करताना बेकायदा दारू वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला असून आयशरच्या मालकाचा शोध घेण्यात येत आहे.









