मुंबई
लक्झरी कारच्या निर्मितीतील कंपनी मर्सीडिझ बेंझ इंडिया आपल्या कार्सच्या किंमती नव्या वर्षापासून वाढवणार असल्याची माहिती आहे. सदरच्या किंमतीत 2 टक्क्यापर्यंत वाढ दिसणार आहे. सदरच्या वाढीव दरातील किंमती या जानेवारी 2022 पासून लागू होतील. निवडक मॉडेलच्या किंमती वाढवल्या जाणार आहेत, असेही कळते. चार महिन्यापेक्षा आधीच ज्यांनी गाडी बुक केलीय त्यांना आहे त्याच किंमतीत गाडी मिळणार असल्याचेही समजते.









