वार्ताहर / कास
सतत पडणाऱ्या आवकाळी पावसासह तिन दिवस पडलेल्या गारपीटीचा तडाखा डोंगर कपारीलाही भसला असुन हातातोंडाशी आलेली भात नाचणी हि पिके शेतातच झडुन जाऊ लागली आहेत. जनावरांसाठी जमा केलेला वाळका चारा शेतातच कुजू लागला असुन उगवलेल्या गहु पिकावर रोग पडण्याच्या भितीने कास परळी बामणोली तापोळा ठोसेघर परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे.
मागील दोन महीन्यात पावसाच्या उघडीपी ऐवजी वारंवार त्याची अधुन मधुन बरसात सुरु आहे त्यामुळे हाता तोंडाशी आलेलं ड़ोंगरकपारीतलं भात व नाचणीचे पिक जमविताना शेतकऱ्यांची पुरती तारंबळ उडाली काहीशा शेतकऱ्यांनी पिक गोळा केलं असलं तरी अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होताना दिसत असुन या पावसापुढे शेतकरी हतबल झाल्याचे दिसुन येत आहे.
शेतकऱ्यांपुढे भात नाचणीचे पिक जमा करतानाच गहु पिकाच्या पेरणीसह जानावरांसाठी वाळका चारा गवत गोळा करण्याचे अव्हान असते मागील पावसाच्या उघडीपीमध्ये गहु पिकांची बहुंतांश ठिकाणी पेरणी झाल्याचे दिसुन येत असुन त्याची चांगली उगवण ही झाली आहे मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे त्यावर रोग पडण्याच्या शक्यता नाकारता येत नाही तर भात शेतीतुन जनावरांसाठी निर्माण झालेला भाताचा पेंडा वाळका चारा म्हणुन वापरला जातो तोही मोठया प्रमाणात कुजून गेला असुन काढलेला वाळका चारा गवत तही कुजुन गेले असुन ऊभी असलेली वैरणही भुईसपाट झाली आहे त्यामुळे या चितांतुर झालेल्या शेतकऱ्याला शासनाकडुन मदतीचा हात मिळणार का असा प्रश्न उपस्थीत होत असुन मदत मिळावी अशी मागणीही होत आहे.