धामोड/ वार्ताहर
धामोड ता. राधानगरी येथील तुळशी जलाशय परिसराला गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाने झोडपले असून तुळशी जलाशय परिसरात गेल्या २४ तासात ६९ मि. मि. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. अवकाळी पावसाने ऊस तोडण्या थांबल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
गेल्या दोन दिवसापासून तुळशी खोऱ्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. तुळशी जलाशय परिसरात गेल्या चोवीस तासात ६९ मि. मि. पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण ४१६३ मि. मि. पाऊस झाला आहे. तर ६१६ .९१ मिटर संचय पाणी पातळीपैकी सध्या ६१६ .०६ मीटर पाणी पातळी झाली आहे . शिवाय जलाशयात सध्या ३३१८दलघफू पाणीसाठा झाला आहे. डिसेंबर महिन्यातही पावसाळ्यातील ऋतूप्रमाणे अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांच्या ऊस तोडण्या खोळंबल्या आहेत. ऊसतोडणी मजूर व वहातुकदारांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.