प्रतिनिधी /बेळगाव
टिळकवाडी पहिले रेल्वे गेट येथील बॅरिकेड्स हटविण्यासाठी येथील नागरिकांनी वाहतूक पोलीस स्थानकाच्या (दक्षिण विभाग) समोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील मुख्य संपर्क रस्ता बंद केल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. विनाकारण वळसा घालून जावे लागल्याने पेट्रोल वाया जात आहे.
ज्या नागरिकांना या आंदोलनात सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी आपली नावे सुभाष घोलप, देशमुख रोड, वसंत शिंदे काँग्रेस रोड, नितीन भट्ट साईमंदिर रोड, जयराम बांदेकर शिवाजी कॉलनी येथे नावे नोंदवावीत.









