नवी दिल्ली
टेस्ला कंपनीने आपल्या कार उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी शांघाई येथील कारखान्याकरीता 187 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. त्याचप्रमाणे सदरच्या कारखान्यातील कर्मचाऱयांची संख्याही वाढवली जाणार असल्याचे समजते. टेस्ला येणाऱया काळात 4 हजार जणांना नव्याने भरती करून घेणार असून नंतरच्या काळात 19 हजारपर्यंत कर्मचारी एकूण भरती करण्याची क्षमता ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.









