सेटवरून छायाचित्र शेअर करत दिली माहिती
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी ऍक्शन चित्रपट ‘योद्धा’चे चित्रिकरण सुरू झाले आहे. यासंबंधीची माहिती सिद्धार्थनेच स्वतःच्या चित्रपटाच्या सेटवरील छायाचित्र शेअर करत दिली आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्याने ‘योद्धाचे शूटिंग सुरू झाले’ असे नमूद पेले आहे.

सागर आम्ब्रा आणि पुष्कर ओझा या जोडीकडून दिग्दर्शित होणारा ‘योद्धा’ हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट करण जौहरच्या धर्मा प्रॉडक्शन्स आणि शशांक खेतानच्या ‘मेंटर डिसिप्लिन फिल्म्स’ अंतर्गत निर्माण केला जातोय. काही दिवसांपूवीं चित्रपटामधील सिद्धार्थच्या फर्स्ट लुकचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. लवकरच या चित्रपटातील नायिकेची घोषणा करण्यात येणार आहे. तर दिशा पाटनी आणि राशी खन्ना या दोघींपैकी एकीची मुख्य नायिका म्हणून निवड होण्याची शक्यता आहे.
सिद्धार्थचा चालू वर्षी ओटीटीवर प्रदर्शित शेरशाह हा चित्रपट चांगलाच गाजला आहे. या चित्रपटामुळे सिद्धार्थच्या कारकीर्दीला बळ मिळाले आहे. चित्रपटातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून मोठी दाद मिळाली होती.









