क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
केएलई अकादमी व हायर एज्युकेशन आणि रिसर्च तर्फे काहेर 2021 केएलई विद्यापिठ ऍथलेटीक्स स्पर्धेत केएलई इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिओ थेरपी संघाने या स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद तर उत्कषा चव्हाण व दिव्या पार्चिकर यांनी वैयक्तिक विजेतेपद पटकाविले.
जिल्हा क्रिडांगणावर घेण्यात आलेल्या काहेर 2021 क्रीडा स्पर्धा मोठय़ा उत्साहात पार पडल्या. बक्षिस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बेळगाव पोलीस उपायुक्त यशोधा वंटगुडी, जे. एन. मेडिकल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. महांतशेट्टी, प्राचार्य डॉ. सुहासकुमार शेट्टी, रजिस्टर डॉ. सुनिल जलालपूरी, प्राचार्य संजीवकुमार, प्राचार्य डॉ. एम. ए. उडचणकर, उप प्राचार्य डॉ. पी. जी. जद्दार, डॉ. रणजित कांगले, क्रिडा निर्देशक रविंद खोत आदी उपस्थित होते. बक्षिस वितरण प्रसंगी यशोधा वंटगुडी म्हणाल्या वैद्यकीय शिक्षण घेत असताना आपण खेळाडके व आपल्या शरिराकडे लक्ष दिले पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रात असताना आपण सामाजिक कार्य जोपासले पाहिजेत. खेळात भाग घेणे हे गरजेचे असुन, बक्षिस मिळविणे मोठे नसून आपण नेहमी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्या डोक्मयावर अभ्यासाचा ताण असतो. पण तो ताण मिटविण्यासाठी खेळ व योगा यांच्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे तरच आपण समतोल असू शकतो. त्यांच्या हस्ते या स्पर्धेतील सर्वसाधारण विजेतेपद पटकाविलेल्या फिजिओथेरपी महाविद्यालय संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. तर वैयक्तिक विजेतेपद पटकाविलेल्या उत्कर्ष चव्हाण व दिव्या पार्चिकर यांनाही चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत एकूण 622 खेळाडुंनी भाग घेतला होता. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व महाविद्यालयाच्या व जिल्हा क्रिडांगणाच्या पदाधिकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले.