एसटी कर्मचाऱयांचा संप मात्र सुरूच
प्रतिनिधी / कणकवली:
राज्य परिवहनच्या कर्मचाऱयांना शासनाने पगारवाढ लागू केली असली तरीही कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्दय़ावर कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गमध्ये सलग 19 व्या दिवशीही कामबंद आंदोलन सुरू आहे. मात्र, शुक्रवारी विभागीय कार्यशाळा व कार्यालयातील मिळून 194 कामगार हजर झाल्याची माहिती एसटीचे यंत्र अभियंता (चालन) रमेश कांबळे यांनी दिली
सिंधुदुर्ग एसटी विभागात चालक, वाहक, मॅकेनिक व अन्य विभागात 2146 कर्मचारी कार्यरत आहेत. सरकारच्या आवाहनानंतर गुरुवारी 159 कर्मचारी हजर झाले होते. तर शुक्रवारी ही संख्या 194 झाली. हळूहळू सर्वच कर्मचारी कामावर हजर होतील. आम्ही एसटी कर्मचाऱयांना कामावर हजर होण्याचे आवाहन करत आहोत. जास्तीत जास्त संख्येने कामावर हजर व्हावे. त्यामुळे एसटी बसेस सुरू करता येतील. जे कर्मचारी आवाहन करूनही काम करण्यासाठी येत नाहीत, त्यांची पगार कपात होणार असल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी तातडीने हजर व्हावे, असेही कांबळे यांनी सांगितले.









