वृत्त संस्था/ दुबई
आयसीसी टी-20 क्रिकेट प्रकारात फलंदाजाच्या ताज्या मानांकन यादीत भारताचा सलामीचा फलंदाज केएल राहुलने पाचवे स्थान मिळविले आहे. राहुलचे स्थान एका अंकाने वधारले आहे.
टी-20 फलंदाजांच्या मानांकन यादीत पाकचा यष्टीरक्षक आणि फलंदाज मोहम्मद रिझवानने चौथे स्थान मिळविले. बांगलादेशविरूद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत रिझवानने 90 धावा जमविल्या. भारताच्या केएल राहुलने न्यूझीलंडविरूद्धच्या दोन टी-20 सामन्यात 80 धावा जमविल्याने या मानांकन यादीत त्याने पाचवे स्थान पटकाविले. न्यूझीलंडचा गप्टील दहाव्या तर रोहित शर्मा 13 व्या स्थानावर आहेत.
टी-20 गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत न्यूझीलंडच्या सँटेनरने 13 वे, भारताच्या भुवनेश्वरकुमारने 19 वे त्याचप्रमाणे दीपक चहरने 40 वे स्थान मिळवले. बांगलादेशचा मेहदी हसन 12 व्या, पाकचा शदाब खान 14 व्या आणि हसन अली 44 व्या स्थानावर आहे.









