रितेश देशमुख आणि फरदीन खान दीर्घकाळापासून स्वतःचा आगामी चित्रपट ‘विस्फोट’वरून चर्चेत आहेत. अलिकडेच या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले आहे. आता या चित्रपटाशी संबंधित एक नवी माहिती समोर आली आहे. चित्रपटात आता अभिनेत्री क्रिस्टल डिसूझाची एंट्री झाली आहे. क्रिस्टल लवकरच याच्या चित्रिकरणात भाग घेणार आहे.

फरदीनच्या व्यक्तिरेखेची नायिका म्हणून क्रिस्टलची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. क्रिस्टलने चित्रपटात निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या चित्रपटाची कहाणी मुंबईतील डोंगरी भाग आणि शहराच्या गगनचुंबी इमारतींच्या अवतीभोवती घुटमळणारी आहे. चित्रपटात रितेश आणि फरदीन यांची व्यक्तिरेखा परस्परांच्या विरोधात दिसून येणार आहे.
कुकी गुलाटी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. संज्या गुप्ता यांचे व्हाइट फेदर फिल्म्स आणि भूषण कुमार यांची टी-सीरिज या चित्रपटाची निर्मिती करत तआहे. ‘विस्फोट’मध्ये फरदीन टॅक्सी चालक आणि एका पूर्वाश्रमीच्या ड्रग डिलरच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तर रितेश चित्रपटात एका कमर्शियल एअरलाइन पायलटची भूमिका साकारणार आहे.









