प्रतिनिधी / शाहुवाडी
आंबा तालुका शाहूवाडी पैकी तळवडे येथील शांतय्या शंकरय्या स्वामी वय ६० यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घुसून घरातील माणसांच्या वर कोयता व तलवारीने वार करून दरोडा घालत दोन लाख रुपये रोख सहा तोळे सोने गाडी असा मुद्देमाल लंपास केला आहे. या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले आहेत. मंगळवारी ही घटना घडली. शाहूवाडी पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भेट देऊन भेट तपास यंत्रणा गतिमान केली आहे. आंबा पैकी तळवडे येथील शांतय्या शंकरय्या स्वामी त्यांच्या घरात अज्ञात सात ते आठ जणांनी प्रवेश करून घरातील नागरिकांना बांधून ठेवत दोन लाख रुपये सहा तोळे सोने बोलोरो गाडी असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. तसेच दोघांवर कोयता व तलवारीने हल्ला करून त्यांना जखमी केले आहे.