प्रतिनिधी/ सातारा
जिल्हा बँकेसाठी 10 जांगासाठी 20 उमेदवारांमध्ये काटे की टक्कर उद्या होत आहे. जावली विकास सोसायटी मतदार संघातून राष्ट्रवादीचेच उमेदवार ज्ञानेश्वर रांजणे यांना शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी अनेक खटपटी केल्या परंतु त्यात यश आले नाही. त्यामुळे जावलीत लढत ही अटीतटीची होणार आहे. त्याच प्रमाणे माण, खटाव, कराड, पाटण या विकास सोसायटी मतदार संघातून टस्सल असे मतदान होण्याची शक्यता असून सहलीवर गेलेले मतदार थेट मतदान केंद्रावर उद्या पहायला मिळणार आहेत. जे विरोधकांच्यासोबत होते त्यांचा कशी अडवणूक करायची ही गणिते सुरु आहेत. एकूणच उद्याच्या मतदानाच्या टक्केवारीवरुन ठरणार आहे की सहकार पॅनेलमधील कोणाला डच्चू बसणार अन् कोण बाजी मारणार हे.
जिल्हा बँकेच्या निवडणूकीमध्ये सहकार पॅनेल विरुद्ध इतर उमेदवार अशीच लढत होत आहे. त्यामध्ये जिल्हा बँकेमध्ये राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने यापुर्वीच निवडणूक कशी बिनविरोध करता येईल यासाठी सर्व प्रयत्न केले. त्यामध्ये 21 जागांपैकी 11 जागा बिनविरोध करण्यात यश आले तर उरलेल्या जागांमध्येही आणखी काही जागा बिनविरोध करता येतात की नाही यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरु होता. अगदी जावली सोसायटी मतदार संघातून राष्ट्रवादीचेच ज्ञानेश्वर रांजणे यांनी शशिकांत शिंदे यांच्या विरोधातील अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरु होता. परंतु राजंणे यांना मनवण्यासाठी सर्व प्रयत्न झाले परंतु त्यात यश आले नाही. अगदी शनिवारी थेट बारामतीचे शरद पवार यांनी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सुचना जिह्यातील नेते मंडळींना देण्यात आले होते. परंतु जिह्यातील नेते मंडळीकडून प्रयत्न होवूनही ते व्यर्थ ठरले. त्यामुळे जावलीत रांजणे विरुद्ध शशिकांत शिंदे अशीच सरळ सरळ लढत होणार आहे.
माणमध्ये शेखर गोरेंचा की मनोज पोळ यांचा वरचष्मा चालणार
माण सोसायटी मतदार संघातून यावेळी शिवसेनेचे शेखर गोरे यांनी सहकार पॅनेलचे मनोज पोळ यांच्या विरोधात निवडणूकीच्या रिंगणात आहेत. सहकार पॅनेलचे उमेदवार मनोज पोळ यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीतून अनेक बड्डे दिग्गज असले तरीही शिवसेनेचे शेखर गोरे हे काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत. त्यामुळे येथे निवडणूक ही अलितटीचीही होणार असून उद्याच्या मतदानावर ठरणार आहे.
खटावमध्ये औंधची जादू कितपत चालणार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी शब्द देताच इच्छूक असलेले नंदकुमार मोरे यांनी आपला अर्ज दाखल केला अन् लढण्यासाठी जय्यत तयारी सुरु केली. त्यांच्या विरोधात माजी आमदार प्रभाकर घार्गे हे आहेत. नंदकुमार मोरे यांच्यासाठी सहकार पॅनेलची औंधची जादू कितीपत चालणार हे उद्याच्या मतदानावर ठरणार आहे.
कोरेगावात खत्री आणि महाडिक
कोरेगाव सोसायटी मतदार संघातून उद्याच्या होणाऱया मतदानामध्ये कोरेगावातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक यांच्या विरुद्ध सुनील खत्री हे निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे विद्यमान उपाध्यक्ष सुनील माने यांना डावल्याने कोरेगावात मोठा नाराजीचा सुर आहे. त्यामुळे रविवारच्या मतदानाच्या टक्केवारीवर बरेच काही अवलंबून आहे.
पाटणमध्ये पारंपारिक अशा लढती
पाटण सोसायटी मतदार संघातून उद्याच्या मतदानासाठी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पारंपारिक शत्रू सत्यजितसिंह पाटणक यांच्या विरुद्ध निवटडणूक लढवली जात आहे. त्यामुळे या पारंपारिक लढतीकडे तालुक्यासह जिह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
पालकमंत्री पाटील विरुद्ध ऍड. उदयसिंह उंडाळकर
पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे विद्यमान सहकार मंत्री आहेत. त्यांच्याच विरुद्ध माजी सहकारमंत्री विलासराव उंडाळकर यांचे चिरंजीव ऍड. उदयसिंह उंडाळकर यांच्यामध्ये लढत होत आहे. ही लढत अतशिय चुरशीची अशी होणर आहे.
मागासवर्गीय आणि महिला मदतदार संघातही लढती टस्सल
मागासवर्गीय, महिला मतदार संघ, बँकर्स मतदार संघात काटे की टक्कर अशाच पद्धतीने लढत होत आहे. त्याचे चित्र प्रत्यक्ष मतामध्ये उमटणार किती हे पहायला मिळणार आहे. मागासवर्गीय मतदार संघातून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या विरोधात शिवसेनेचे शेखर गोरे हे लढत आहेत. तर महिलांमध्ये सहकार पॅनेलच्या ऋतुजा पाटील आणि कांचन साळुंखे या दोघी आहेत त्या दोघींच्या विरोधात सर्वसामान्य महिला म्हणून दोघी रिंगणात आहेत. बँकर्समधून रामभाऊ लेंभे यांच्या विरुद्ध जाधव हे लढत आहेत. त्यामुळे मतदारांच्या होणाऱया मतदाच्या टक्केवारीही समजणार आहे. उद्या या उमेदवारांसाठी मतदान होत आहे.








