ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
कोरोना संसर्गाने गेल्या दोन वर्षात संपुर्ण जगाला तडाका दिला आहे. याचे परिणाम जगभरातील मानवी समुदायावर अर्थिक, सामाजिक स्तरावर झाले आहेत. मात्र गेल्या काही दिवसात कोरोनाची ही स्थिती पुर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे. मात्र नवीन मिळालेल्या माहितीनुसार ऑस्ट्रियात कोरोनाच्या नव्या लाटेला थोपवण्यासाठी मोठा निर्णय घेतला असुन यासाठी लॉकडाऊन पूर्णपणे पुन्हा लादणार आहे. हा निर्णय घेणारा युरोपमधील पहिला देश आहे. याचबरोबर लसीकरण मोहिम अधिक तीव्र करत लसीकरण न केलेल्या लोकांसाठा लॉकडाऊन सुरु केले आहे.
साल्झबर्ग आणि अप्पर ऑस्ट्रिया या दोन सर्वाधिक प्रभावित प्रांतांनी गुरुवारी सांगितले की ते स्वतःचे लॉकडाउन लादतील आणि राष्ट्रीय स्तरावर असे करण्यासाठी सरकारवर दबाव वाढवतील. सद्या युरोप पुन्हा महामारीचा केंद्रबिंदू बनला आहे. जगातल्या रुग्णसंख्येच्या जवळपास निम्मी रुग्णसंख्या तसंच मृत्यू युरोपतले आहेत. संक्रमणाच्या चौथ्या लाटेने युरोपची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीला राष्ट्रीय आपत्कालीन स्थितीत आणले आहे. आरोग्य मंत्री जेन्स स्पॅन यांनी इशारा दिला आहे की केवळ लसीकरणाने प्रकरणांची संख्या कमी होणार नाही.
एकुणच या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर भारत सरकारने यावर वेळीच निर्णयायक भुमिका घेत आवश्यक त्या सर्व यंत्रणा सक्रियरित्या तयार ठेवणे अत्यावश्यक आहे. कारण कोरोनाची किंमत दोन्ही कोरोना लाटेत सामान्य जनेतेने चुकती केली आहे. आणि कित्येक नागरिकांनी आपल्या आप्तजनांना गमावले आहे. त्यामुळे आता गरज आहे. ती घर जाळुन कोळसा करण्यापेक्षा वेळीच सावध होत. नियोजन करण्याची. कारण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अर्थिक विवंचनेत सापडलेल्या सामान्यांना पुन्हा कोरोना लाट आल्यास लॉकडाऊनसाठी घरी थांबण्यासारखी स्थिती राहिलेली नाही. याच बरोबर नागरिकांनी ही कोरोना नियमांचे पालन करत सतर्क राहणे आवश्यक आहे.