ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
गुजरातमधील मुंदा बंदरावर एका मालवाहू जहाजात पाकिस्तानातून आलेले घातक किरणोत्सारी पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. सीमा शुल्क आणि महसूल गुप्तचर संचालनालयाने ही कारवाई केली आहे. अदानी बंदर प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.
18 नोव्हेंबरला सीमा शुल्क आणि डीआरआयने बंदरावरील जहाजाची तपासणी केली असता एका मालवाहू जहाजावरील कंटेनरमध्ये वर्गवारी 7 मधील घातक किरणोत्सारी पदार्थ आढळून आले. या जहाजावरील सर्व कंटेनर्स खाली उतरवण्यात आले असून त्यांची तपासणी सुरू आहे. विशेष म्हणजे हे जहाज पाकिस्तानच्या कराचीतून चीनमधील शांघायकडे जात होते. हे जहाज मुंद्रा बंदरावर उतरणं अपेक्षित नव्हतं. मात्र, ते या बंदरावर कसे उतरले, याचाही तपास अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.









