पदवीपूर्व महाविद्यालय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
शिंदोळी येथील गोपाळ जि. इंटीग्रेटेड पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित व्हॉलिबॉल, थ्रोबॉल, कब्बड्डी, खोखो स्पर्धांचे आयोजन केले होते. व्हॉलिबॉलमध्ये सिद्धरामेश्वर पदवीपूर्व महाविद्यालयाने मुलामुलींच्या गटात जेतेपद मिळवले. लिंगराज महाविद्यालयाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कब्बड्डी व खोखोमध्ये ज्योती महाविद्यालयाला विजेतेपद तर मराठा मंडळला उपविजेतेपद, थ्रोबॉलमध्ये मुलांमध्ये आरपीडी विजेतेपद तर मुलींमध्ये मराठा मंडळने विजेतेपद पटकाविले.
या क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे पदवीपूर्व महाविद्यालयाचे उपसंचालक एन. नागराज, संस्थेचे चेअरमन गोपाल जिनगौडा, उपाध्यक्ष पी. जिनगौडा, सचिव संदीप चिपरे, जी. एन. पाटील, प्रभू, प्राचार्य काशिनाथ चिगरे उपस्थित होते.
व्हॉलिबॉलमध्ये मुलांच्या गटात पहिल्या उपांत्य सामन्यात सिद्धरामेश्वर महाविद्यालयाने बसवराज होरट्टी महाविद्यालयाचा 25-13, 25-10 तर दुसऱया उपांत्य सामन्यात लिंगराज संघाने आरएलएसचा 25-18, 25-19 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली.
अंतिम सामन्यात सिद्धरामेश्वर संघाने लिंगराज संघाचा 25-15, 25-17 अशा सेटमध्ये पराभव केला. मुलींच्या गटात सिद्धरामेश्वर संघाने आरपीडी संघाचा 25-13, 25-17 तर लिंगराज संघाने गोपाल जी. संघाचा 25-14, 25-16 अशा सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात सिद्धरामेश्वर संघाने लिंगराज संघाचा 25-19, 25-18 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले.
कबड्डीमध्ये मुलांच्या गटात ज्योती महाविद्यालयाने सीएसएस संघाचा 24-18, मराठा मंडळने आरपीडीचा 20-12 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. ज्योती महाविद्यालयाने मराठा मंडळचा 22-17 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
मुलींच्या गटात ज्योती महाविद्यालयाने शिंदोळी संघाचा तर मराठा मंडळने जीएसएसचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात ज्योती संघाने मराठा मंडळचा 15-12 अशा गुणांनी पराभव करून विजेतेपद पटकाविले.
खोखोमध्ये मुलांच्या अंतिम सामन्यात ज्योती संघाने मराठा मंडळचा तर मुलींच्या गटात ज्योती संघाने मराठा मंडळ संघाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
थ्रो बॉल अंतिम सामन्यात मुलांच्या गटात आरपीडी संघाने जीएसएस संघाचा 25-20 तर मुलींच्या अंतिम सामन्यात मराठा मंडळ संघाने आरपीडीचा 25-19 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेसाठी जी. एन. पाटील, शांतू पाटील, एच. एस. शिंगाडे, शंकर कोलकार, उमेश मजुकर, भरत अक्षिमनी, अमित जडे, सुनिल बेळगुंदकर, प्रदीप जुवेकर, एन. आर. पाटील, नितीन नाईक, राजु जाधव, पी. एच. सलोमन, श्रीधर लाड, अनिल जिनगौडा, आर. एल. पाटील, अरूण यांनी पंचांची भूमिका निभावली.









