प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील प्रतिपढंरपूर म्हणून मानल्या गेलेल्या ऐतहासिक श्री विठ्ठल रखूमाई मंदिरात कार्तिर्की एकादशी निमित्त संपूर्ण दिवस सुश्राव्य हरिनामाच्या गजरात न्हाउन निघाला. श्री विठ्ठलाची विधीवत पूजा पहाटे 2.30 वाजता पार पडल्यानंतर शासनाच्या कोविड विषयक नियमांचे पालन करून श्री विठ्ठलाच्या दर्शनाचा भाविकांना लाभ देण्यात येउन रात्रौ उशिरापर्यंत मंदिरात भाविकांची मांदियाळी दिसून आली.
श्री विठ्ठल मंदिरात रुढी, परंपरेला अनुसरून आणि शासनाच्या कोविड विषयक नियमांचे पालन करून यावर्षी कार्तिकी एकादशी उत्सव साजरा करण्यात आला. सोमवारी या उत्सवानिमित्त मंदिर व्यवस्थापनाने धार्मिक पध्दतीने हा उत्सव साजरा करण्याची जय्यत तयारी केलेली होती. आकर्षक रोषणाई, रंगंगोटीने मंदिर परिसर उजळून निघाला होता. मागील दोन वर्षे कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे कार्तिकी एकादशीच्या उत्सवावार निर्बध आलेले होते. यावर्षी मात्र कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्याने कोरोनाचे आवश्यक नियम पाळून हा उत्सव साजरा करण्यात आला.
गेल्या वर्षी आषाढी, कार्तिकी एकादशी कोरोना लॉकडाऊनमुळे फक्त मंदिर संस्थेपुरतीच साजरी करण्यात आली. भाविकांना प्रवेश दिला नव्हता. मात्र यंदा कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्यामुळे आषाढीला भाविकांना दर्शनाची संधी मिळाली. यादिवशी मंदिरात पहाटे श्रींची समृध्द महापूजा पार पडली. पूजेचा मान संतोष कुलापकर व सौ. सवी कुलापकर या जोडप्याला लाभला. तसेच पहाटे 4.30 वाजता काकड आरती संपन्न झाली. सोमवारी सकाळी कै. दाजिबा नाचणकर संस्थापित दिंडी भार्गवराम मंदिरापासून निघून विठ्ठल मंदिरात आली. तीचे स्वागत करण्यात आले. संपूर्ण दिवसभर सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम आयोजन करण्यात आलेले होते. त्यामुळे मंदिराचा परिसर दिवसभर ‘हरिनाममय’ बनला होता. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुनच दर्शनाचा भाविकांना लाभ देण्यात आला. मध्यरात्री श्रींची रथोत्सवाची सवाद्य दिंडी प्रथेप्रमाणे काढण्यात आली.
एसटी कर्मचारी संपामुळे बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल रोडावली
कार्तिक एकादशीनिमित्त रत्नागिरीतील श्री विठ्ठल मंदिरात साजरा होणाऱया उत्सवाची मोठी यात्रा भरते. मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविकांमुळे †िंदवसभर शहरात मोठी गजबज असते. या यात्रेनिमित्त बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होत असते. पण यावर्षी या उत्सवावर एसटी कर्मचारी संपाचा मोठा परिणाम जाणवला. गावोगावचे भाविक मोठय़ा संख्येने एसटी बसने येत असतात. पण एसटी सेवा बंद असल्याने या यात्रेतील होणारी भाविकांची गर्दी रोडावलेली होती. त्याचा परिणाम बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीवर दिसून आला.









