ऑनलाईन टीम / भोपाळ :
भोपाळमधील हबीबगंज रेल्वे स्टेशन हे देशातील पहिलं वर्ल्ड क्लास स्टेशन म्हणून ओळखलं जाणार आहे. 15 नोव्हेंबरला या स्टेशनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या स्टेशनला स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव द्या, अशी मागणी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केली आहे.
प्रज्ञा सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”हबीबगंज रेल्वे स्थानकाच्या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार हे शुभसंकेत आहेत. रेल्वे स्थानकाचं नाव बदलून अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव स्थानकाला देण्याची घोषणा पंतप्रधान मोदी करतील, असा मला विश्वास आहे.”
यापूर्वी मध्य प्रदेशचे सूचना आयुक्त विजय मनोहर तिवारी यांनीही हबीबगंज रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी केली होती.









