कोल्हापूर / प्रतिनिधी
फडणवीस यांना कोरोना झाल्यानंतर ते सरकारी रुग्णालयात दाखल झाले होते पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकारी रुग्णालय चालत नाही याचाच अर्थ राज्यातील सरकारी रुग्णालय सुस्थितीत नाहीत हे सिद्ध होतंय अशी बोचरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.
याचबरोबर नवाब मलिक यांना राज्यातील कोणत्याही गावात फिरू देणार नाही. एनआयएनं मलिक यांना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे तसेच नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. अशी नवाब मलिक यांच्या इशाऱ्याला चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत दररोज सकाळी बोलून दमले असुन आता नवाब मलिक बोलत आहेत, संजय राऊत आणि मलिक यांच्यामध्येच स्पर्धा सुरू झाली आहे, संजय राऊत यांना आता बोर्नविटा पिण्याची गरज आहे असा टोला चंद्रकांतदादा पाटील यांनी लगावला