बेंगळूर / प्रतिनिधी
छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीने तिच्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली असून बेंगळूरमध्ये तिच्यावर बलात्कार आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे, असे पोलिसांनी बुधवारी सांगितले.
बसवनगुडी महिला पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत फिर्यादीने म्हटले आहे की, लग्नापूर्वी आरोपी लॉकडाऊन काळात बाहेर भेटणे शक्य नाही असे सांगून तिच्या घरी आला आणि तिच्यावर बलात्कार केला. ती रडत असताना आरोपीने तिला लग्नाचे आश्वासन दिले आणि सर्व काही ठीक होईल असे सांगितले. नंतरही, तिची संमती नसतानाही त्याने या अभिनेत्रीसोबत शारीरिक संबंध ठेवले. लग्नानंतर तिचा पती, त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. आरोपींनी आपल्यावर हल्ला केल्याचा दावाही तिने केला आहे.
आरोपी आणि तक्रारदार अभिनेत्री यांची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एकमेकांशी ओळख झाली त्यानंतर ते दोन वर्षांपासून मित्र होते. या अभिनेत्रीने कन्नड रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला आहे असुन ती खूपच लोकप्रिय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री आता तिच्या पतीपासून विभक्त झाली आहे. आरोपींसोबत लग्न करण्यासाठी अभिनेत्रीने संघटनांची मदत घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलीस या प्रकरणाची माहिती गोळा करत असून अभिनेत्रीच्या मित्रांचे जबाबही नोंदवत आहेत.