पॅरा शिक्षकांची मागणी
प्रतिनिधी /पणजी
गेल्या दहा वर्षापासून नोकरीत कायम करा अशी मागणी करणाऱया पॅरा शिक्षकांनी आम्हाला एकतर वेतनश्रेणी लागू करा किंवा नोकरीत कायम करा अशी मागणी पॅरा शिक्षकांनी केली आहे. नोकरीत कायम असलेल्या शिक्षकांच्या बरोबरीने काम करीत आहोत किंबहुना त्यांच्याहून अधिक काम करीत आहोत मग आमच्यावरच अन्याय का मागणी पूर्ण न झाल्यास पुढील पाऊल उचलणार असा इशाराही पॅरा शिक्षकांनी दिला आहे.
येथील आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परिषेदेत स्मिता देसाई बोलत होत्या यावेळी त्यांच्या सबोत बबीत नाईक व इतरत पॅरा शिक्षक उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पॅरा शिक्षकांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या असे चुकीचे वक्तव्य करीत आहेत. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी पॅरा शिक्षकांसाठी काहीही केले नाही. जी काही पगारवाढ केली आहे ती माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या काळात. त्यांनी आम्हाला नोकरीत कायम करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत का करीत नाही असा प्रश्न स्मिता देसाई यांनी उस्थित केला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 12 महिन्याचे कंत्राट करून दर महिन्याला वेतन मिळणार असल्याचे आश्वासनही दिले होते. सध्य तरी कोणत्याही आश्वासनाची अमंल बजावणी झालेली नाही. गेल्या सहा महिन्यापासून आम्हाला वेतन मिळालेच नाहाअशा स्थितीत आम्ही काय करायचे असेही स्मिता देसाई म्हणाल्या काही शिक्षकांचे वय झाल असून त्यांना आता नोकरी मिळणेही कठीण आहे. सरकारला हवे असेल तर सराकार आम्हाला नोकरीत कायम करू शकतात मात्र तसे करायचे नसल्याने विविध निमित्त पुढे करून केवळ दिवस ढकलले जात आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पॅरा शिक्षकांसाठी काहीच केलेले नाही. आमच्या रास्त मागणीसाठी आम्ही रस्त्यावर येत असल्याने आम्हाला पोलीस स्थानकावर ठेऊन आमच्या विरोधात गुन्हे नोंद करण्याचे काम केले आहे. असेही स्मीता देसाई यांनी सांगितले.









