जेम्स व्हिन्सचा समावेश, इंग्लंड-न्यूझीलंड उपांत्य लढत उद्या , जेम्स व्हिन्सचा समावेश, इंग्लंड-न्यूझीलंड उपांत्य लढत उद्या
दुबई / वृत्तसंस्था
इंग्लिश सलामीवीर जेसॉन रॉय उर्वरित आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकला गेला असून त्याची जागा जेम्स व्हिन्स घेणार आहे. इंग्लंडला यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शारजाहमध्ये झालेल्या सुपर-12 फेरीतील लढतीत पराभव पत्करावा लागला, त्यादरम्यान रॉयला पोटरीची दुखापत झाली.
दुखापतीमुळे उर्वरित सामन्यात खेळू शकणार नसला तरी जेसॉन रॉय संघासमवेत थांबणार असल्याचे ईसीबीने नमूद केले. इंग्लंडचा संघ उद्या (बुधवार दि. 10) न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य लढतीत खेळणार आहे. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली या संघाने सुपर-12 फेरीत 4 सामने जिंकले. त्यांना फक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.









