बॉलिवूडमध्ये सध्या विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. हे दोघेजण येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे.बॉलिवूडमधील अभिनेता विकी कौशल आणि बार्बी डॉल म्हणून ओळखली जाणारी कतरिना कैफ यांच्या प्रेमप्रकरणाची गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा आहे. केवळ इतकेच नाही तर हे दोघेजण येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचेही काही जणांनी सांगितले आहे. कतरिना आणि विकीचे लग्न राजस्थानमधील रणथंबोर नॅशनल पार्कपासून अवघ्या 30 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सवाई माधोपूर येथील एका किल्ल्यात होणार आहे, ज्याचे नाव ‘सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा’ असे आहे. लग्नासाठी कपडे प्रसिद्ध ड्रेस डिझायनर सब्यसाची करत आहे. अर्थात या दोघांनी कोणताही खुलासा केलेला नाही. परंतु काही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या डिसेंबरमध्ये या दोघांच्या घरी चनई चौघडे वाजणार आहेत.विकी आणि कतरिना अनेक ठिकाणी एकत्र दिसले आहेत.
अलिकडेच विकी कौशलच्या सरदार उधम सिनेमाच्या क्रिनिंगला हे दोघेजण एकत्र दिसले होते. विकी व कतरिना यांच्या लग्नाची बातमी ऐकल्यानंतर त्यांच्या चाहते भलतेच आनंदित झाले अधिकृत घोषणेची ते वाट पाहत आहेत.
Previous Articleआयआरसीटीसीच्या नफ्यात वाढ
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









