ऑनलाईन टीम/तरुण भारत
तालिबानने अफगाणिस्तानच्या सैन्याचा पराभव करत ऑगस्ट २०२० मध्ये सरकार स्थापनेची घोषणा केल्यापासून जगातील कोणत्याही देशाने अद्याप त्यांच्या सरकारला मान्यता दिलेली नाही. आता तालिबानने अफगाणिस्तानमधील आपल्या सरकारला जागतिक मान्यता देण्यासाठी इशारा दिलाय. तालिबानने अमेरिकेसह जगातील इतर देशांनी तालिबान सरकारला मान्यता न दिल्यास आणि जागतिक पातळीवर अफगाणिस्तानचे पैसे गोठवण्याचा निर्णय मागे न घेतल्यास याचे केवळ अफगाणलाच नाही तर जगाला परिणाम भोगावे लागतील, असं मत तालिबानने व्यक्त केलंय.
तालिबानने अफगाणिस्तानची जगभरात इतर ठिकाणी असलेली बिलियन डॉलरची संपत्ती आणि जमा ठेव रक्कम देखील गोठवण्यात आली आहे. यामुळे अफगाणिस्तानला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत आहे.