असळज/प्रतिनिधी
सध्या कोरोनामुळे शासनाकडून शाळा, कॉलेज टप्या टप्याने सुरू केली जात आहेत. मात्र शेणवडे [ ता. गगनबावडा ] येथील नग्मंबो विद्या मंदिर शाळेमध्ये विदयार्थी शाळेच्या वेळेत उपस्थिती रहातात मात्र शिक्षक शाळेत वेळेलावर येत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पालकांनी विद्यार्थी शाळेत वेळेवर उपस्थित रुजतात पण शिक्षक वेळेवर उपस्थित रहात नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. पालकांनी हा सर्व प्रकार गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे कथन केला आहे.
विद्या मंदिर शेणवडे शाळेमध्ये पहिली ते चौथी पर्यंत वर्ग आहेत. दरम्यान या शाळेत चौगलेवाडी व गुरववाडी येथील विद्यार्थी गगनबावडा – कोल्हापूर या मुख्य रस्त्यावर आपला जीव धोक्यात घालून ये जा करत असतात. विद्यार्थी शाळेला उशीर होईल यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वी हजर असतात. मात्र शिक्षक कायम उशीरा येतात अशी विद्यार्थी वर्गाची तक्रार होती. आज ग्रामपंचायत सदस्य राणोजी सुतार, पोलीस पाटील उत्तम पाटील, पालक सदाशिव सावंत, संजय सावंत, अशोक सुतार, प्रदीप कांबळे यांनी शाळेत जाऊन पहिले असता शिक्षक शाळेची वेळ झालेली असतानाही अजून आले नव्हते. हा प्रकार शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिला आहे . यावेळी विद्यार्थी शाळेच्या व्हराड्यात शाळा सुरु होणेच्या वेळेनंतरही शिक्षकाची वाट पाहत होते.
शिक्षकानी शाळेमध्ये ११ पूर्वी हजर होणे आवश्यक होते मात्र त्या ११ . ३० ला शाळेमध्ये हजर झाल्या. याबाबत पालकांनी शिक्षीका अंजली वडर यांना जाब विचारला. यावेळी मुख्याध्यापक कृष्णात धनवडे हे शाळेच्या तपासणीच्या नावाखाली पंचायत समितीत गेल्याचे सांगण्यात आले मात्र या तपासणी बाबत शाळेच्या हालचाल रजिस्टरला कोणतीही नोंद नसल्याचे निदर्शनास आले आहे . याबाबत गट शिक्षणाधिकारी बसवेश्वर किल्लेदार याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ते कोठे आहेत त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले. यावेळी पालक म्हणाले या दोन शिक्षकाची बदली करावी, नाहीतर आम्ही मुलांना शिक्षणासाठी बाहेर घालवितो. हे शिक्षक वेळेवर शाळेमध्ये येत नाहीत त्यांच्या विरोधात तक्रारी आहेत. त्यांची बदली करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
गगनबावडा तालुक्यामध्ये काही शिक्षक प्रामाणीक शिक्षण शिकवतात त्यामध्ये नाविण्य असे उपक्रम राज्य पातळीवर राबवतात तर काही शिक्षक दिवस घालवण्याचे काम करतात. त्यामुळे प्रामाणिक काम करणाऱ्यांची प्रशासनाने दखल घेवून वेळ काढू शिक्षकावर कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा शिक्षणाचा दर्जा खालावेल अशी भीती आहे.