प्रतिनिधी/ रत्नागिरी
तालुक्यातील जयगड येथून चार दिवसांपूर्वी मच्छिमारीसाठी गेलेली बोट अद्यापही न परतल्याने प†िरसरात खळबळ उडाली आह़े ही बोट समुद्रात बुडाल्याची दाट शक्यता वर्तवली जात असून त्या बोटीवरील 6 खलाशीही अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आह़े जयगड पोलीस ठाण्याची यंत्रणाही शोध कार्यात गुंतली आह़े
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीवरील बेपत्ता खलाशांमध्ये दत्तात्रय झगडे, दगडू तांडेल, अनिल आंबेरकर, गोकूळ नाटेकर, अमोल जाधव, सुरेश कांबळे आदी खलाशांचा समावेश आह़े जयगड येथील मोमताह महम्मद शरिफ यांची या घटनेची खबर पोलिसांत दिल़ा त्यानुसार जयगड येथील नासिर हुसेनमियाँ संसारे यांच्या मालकीची नावेद (आयएनडीएमएच4एमएम3555) ही मच्छीमारी बोट 26 ऑक्टोबर रोजी जयगड बंदरातून मासेमारीसाठी रवाना झाली होत़ी ही बोट 28 रोजी जयगड बंदरात परत येणे अपेक्षित होत़े मात्र 30 तारखेपर्यंत ही बोट जयगड बंदरात परत आली नाह़ी
या बोटीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आल़ा मात्र कोणताही संपर्क होवू शकला नाह़ी स्थानिक मच्छीमारांनी आपल्या नौकांद्वारे या बोटीचा शोध घेण्याचा प्रयत्न केल़ा मात्र ही बोट तसेच या बोटीवरील खलाशांचा कोणताही पत्ता लागू शकलेला नाह़ी यामुळे ही बोट बुडाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी घटनास्थळी भेट दिल़ी जयगड पोलिसांकडूनही बोटीचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आह़े









