ऑनलाईन टीम / नवी मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गणपतीपुळे येथे आयोजित परिवार संवाद केला आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता. चंद्रकांत पाटील हल्ली झोपेत ही बोलतात असे कानावर आले आहे. त्यामुळे त्यांना महत्त्व देत मनावर घ्यायच नाही. अशा शब्दात चंद्रकांत पाटील हे दखलपात्र नसल्याचे त्यांनी अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी समीर वानखेडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नबाब मलिक यांच्याबाबत पाटील यांनी भाष्य केले आहे.
भाजपाने एका अधिकाऱ्याच्या बाबतीत एवढे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. मलिक माहिती उघड करत आहेत.त्याला वानखेडे उत्तर देतील. मात्र वानखेडेंच्या जातीच्या प्रमाणपत्रावर राज्यातील सामान्य माणसाला निर्माण झालेली शंका किंवा आर्यन खान यांच्या कारवाईतील मलिक यांनी दिलेल्या माहितीत सर्व काही उघड झाले आहे. यात वानखेडे आणि मलिक आपापली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडतील. यामध्ये पडून भाजपाने त्यांचा कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही. असे ही ते यावेळी म्हणाले.