मुंबई/प्रतिनिधी
इंधन दरवाढीमुळे सामान्य जनता हैराण झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आठवड्यात आज सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाइटनुसार, शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये ३५ पैशांनी वाढ झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीत आज पेट्रोल १०८.९९ रुपये प्रति लिटर, मुंबईत ११४.८१ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याच वेळी, दिल्लीत डिझेल ९७.७२ रुपये प्रति लिटर आणि मुंबईत १०५.८६ रुपये प्रति लिटर विकले जात आहे.
छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात पेट्रोलच्या दराने नवा विक्रम केला आहे. बालाघाटमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १२०.०६ रुपये आहे. तर डिझेल १०९.३२ रुपये प्रतिलिटर झाली आहे.









