पाच हजारांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
प्रतिनिधी /बेळगाव
कामत गल्ली येथील लक्ष्मीदेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याने यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी आयोजित महाप्रसादाचा लाभ पाच हजारांहून अधिक भाविकांनी घेतला.
रविवारी मिरवणुकीने मूर्ती कामत गल्ली येथे आणण्यात आली. त्यानंतर महिलांच्यावतीने ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. मंगळवारी सकाळी टेंगिनकेरा गल्ली येथील नागरिकांनी चांदीचा मुकुट व वाळे देवीला अर्पण केले. देवीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.









