मुंबई/प्रतिनिधी
मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना आजची रात्री आर्थर रोड कारागृहातच काढावी लागणार आहे. यांच्या जामिनावर उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान, ड्रग्ज प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत आज आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी अरबाज मर्चंटचे वकील अमित देसाई आणि मुनमुनचे वकील अली कशिफ यांनी युक्तीवाद केला.
दरम्यान, आर्यन खानच्या जामीनावर आज मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यामध्ये आर्यन खानला दिला मिळालेला नाही. जामिनावर उद्या पुन्हा सुनावणी पार पडणार आहे. मुकुल रोहतगी आणि अमित देसाई यांच्यावतीने आर्यन आणि अरबाजची बाजू मांडण्यात आली. दोघांवर केलेली कारवाई अनधिकृत असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. अखेर या प्रकरणाची सुनावणी उद्या पार पडणार असल्याची माहिती न्यायालयाने दिली.
कार्डेलिया क्रूज ड्रग्ज केस प्रकरणात आर्यन खान ३ ऑक्टोबरपासून अटकेत आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयात एनसीबीने आर्यन खानचा जामीन फेटाळायलाच हवा अशी मागणी केली. साक्षीदारांना फोडण्याचे आणि पुराव्यांशी छेडछाडीचा प्रयत्न केला जात असल्याचं एनसीबीने यावेळी न्यायालयात सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.