ऑनलाईन टीम / मुंबई
गेले काही दिवस आर्यन खान(Aryan khan) ड्रग्ज प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकिय वातावरण ढवळुन निघाले आहे.आर्यन खान, समीर वानखेडे, आणि नवाब मलिक यांचा जावाई यांच्यावरील कारवाई याच मुद्यांभोवती राजकारण फिरत आहे. याच पार्श्वभुमीवर आर्यन खान याच्यावरील फोकस आता समीर वानखेडेंवर (Sameer Wankhede) आला असुन त्यांनी केलेले निकाह आणि त्यांचा धर्म यावर वानखेडे यांचा निकाह लावणाऱ्या काझी मौलाना मुजम्मिल अहमद यांनी पहिल्या निकाहवेळी समीर वानखेडे मुस्लिम होते. त्यामुळेच त्यांचा निकाह होऊ शकला. असे म्हणत यावर स्पष्टीकरण दिले आहे.
संपूर्ण वानखेडे कुटुंबीय मुस्लीम आहेत. जर त्यावेळी हिंदू सांगितलं असतं तर निकाहच झाला नसता, असा दावा समीर वानखेडे यांचा निकाह लावणाऱ्या काझी मौलाना मुजम्मिल अहमद यांनी केला आहे. समीर वानखेडे यांचे वडीलही मुस्लिम असुन संपुर्ण कुटुंब मुस्लिमच आहे. तसेच वानखेडे यांच्या त्या लग्नातील फोटो काझी मुजम्मिल अहमद यांना दाखवला असता तो खरा फोटो असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. खंडवालामध्ये असलेल्या एका हॉलमध्ये शानदार पद्धतीनं झाला होता. तसेच मेहरची रक्कम 33 हजार होती, निकाहच्या वेळी 2 हजार लोकं उपस्थित होते. असा दावा त्यांनी केला. यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढणार आहेत.