दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा… असं म्हणत दरवर्षी अवघा देश या प्रकाशोत्सवात न्हाऊन निघतो. मागील दोन वर्षे कोविडमुळे या सणाचा आनंद लुटताना काळजीची रेषा होती. यंदा त्याची तीव्रता बर्याच अंशी सरली आहे. त्यामुळे यावेळी यंदाची दिवाळी धूमधडाक्यात साजरी होणार आहे.
- घराची सजावट, पाहुण्यारावळ्यांची ये-जा, गाठीभेटी याबरोबरीने खरेदी हा दिवाळीचा एक महत्त्वाचा घटक आहे.
- वर्षभरातील सर्वाधिक खरेदी दिवाळीला होत असते. अर्थातच यामध्ये महिलावर्ग आघाडीवर असतो. हल्ली खरेदीसाठीचं अवकाश खूप विस्तारलेलं आहे. त्यामुळंच खरेदीसाठीची तयारी करणंही गरजेचं आहे.
- स्मार्ट खरेदी करताना काही गोष्टी नक्की लक्षात घ्या. आधी खरेदीची यादी करा.
- कोणत्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि त्यांची बाजारात काय किंमत आहे याची चौकशी करा.
- क्रेडीट कार्डाऐवजी ती रक्कम रोख किंवा डेबीट कार्डने देता येईल का याचा विचार करा.
- डिस्काउंट किती मिळतोय यावर नक्की लक्ष द्या. इंटरनेटवर त्या गोष्टीचे पर्याय उपलब्ध आहेत का याची पाहणी करा किंवा बाजारात चक्कर मारून याची खात्री करा आणि मगच कोणती गोष्ट कुठून खरेदी करायची याचा निर्णय घ्या.
- घेतलेल्या वस्तूंचे बिल मागून घ्यायची सवय लावून घ्या. तसेच त्याची वॉरंटी किती आहे याची चौकशी करा. बरेचदा सणासुदीसाठी येणार्या ऑफर या तात्कालीन असतात. त्यामुळे वस्तू परत करायच्या झाल्या किंवा बदलायच्या असतील तर ती शक्यता आहे का याची खात्री करा. या गोष्टी पडताळून पाहिल्या तर तुमची खरेदी मनाजोगती आणि बजेटला धरून होईल.









