ऑनलाईन टीम / मुंबई
राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षा घेतल्या जात असुन याबाबत ढिसाळ नियोजन करत विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी प्रशासन खेळत असल्याचे समोर आले आहे. आज मुंबई, पुणे, नाशिक शहरातील आरोग्य विभागाच्या परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याचं चित्र आहे.
अनेक परीक्षा केंद्रावर सावळा गोंधळ सुरु आहे. अनेक परीक्षा केंद्रांवर पेपर उशीरा पोहोचला असल्याचे चित्र आहे. तसेच मुलांच्या आसनव्यवस्थेही घोळ काही ठीकाणी घोळ झाला आहे. पुण्यात एका केंद्रावर परीक्षेची वेळ होऊनही विद्यार्थांना आसन क्रमांक न मिळाल्याचा आरोप करत विद्यार्थांनी गोंधळ घातला आहे. तसेच परीक्षा केंद्रांवर पेपर फुटला असल्याचा गंभीर आरोप अंधेरी येथील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी केला आहे. यावेळी अधिकारी ही उडवा-उडवीची उत्तर देत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याचबरोबर नाशिकमध्ये बहुतांशी विद्यार्थांना पेपरच मिळालेच नसल्याचं समोर आले आहे.
यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण देत पुण्यात डिजीटल प्रश्नपत्रिकेला तांत्रिक अडचण आल्याने उशीर झाला आहे. यामुळे केवळ ५ ते १० मिनिटं उशीर झाल्याची माहिती मला मिळाली आहे असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे.तसेच तेवढा वेळ वाढवुन देणार असल्याचे ही म्हटले आहे.