प्रतिनिधी /बेळगाव
केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन ऍण्ड रिसर्च (काहेर)च्या दोन कॉलेजच्या राज्यस्तरीय एनएसएस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जे. एन. मेडिकल कॉलेजला सन 2017-18 तर केएलई इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिओ थेरपीला 2018-19 यासाठी सर्वोत्तम एनएसएस युनिट म्हणुन राज्य सरकारच्या युवा सक्षमिकरण आणि क्रिडा खात्याच्या वतीने गौरविण्यात आले.
जे. एन. मेडिकल कॉलेजच्या एनएसएस अधिकारी डॉ. अश्विनी नरसण्णावर व केएलई इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिओथेरपी विभागाच्या एनएसएस अधिकारी डॉ. स्नेहल धर्मायत यांना राज्यस्तरिय सर्वोत्कृ÷ एनएसएस प्रोग्राम ऑफिसर म्हणुन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सामाजिक कार्यासाठी दिलेले योगदान व महाविद्यालययीन स्तरावर राबविलेले स्वच्छता अभियान याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. बेंगळूर येथे झालेल्या कार्यक्रमात क्रिडा मंत्री डॉ. के. सी. नारायणगौडा यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला उच्च शिक्षण मंत्री अश्वथ नारायण, युवा सक्षमीकरण व क्रिडा विभागाच्या मुख्य अतिरिक्त सचिव डॉ. शालिनी रजनीश, एन. एस. एस. ऑफिसर प्रताप लिंगय्या यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. केएलईच्या या यशाबद्दल चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांच्यासह इतर प्राध्यापकांनी त्यांचे कौतुक केले आहे.









