जवळपास 5,700 कोटी रुपये उभारण्याचे कंपन्यांचे ध्येय
वृत्तसंस्था/ मुंबई
पुढील आठवडय़ात दोन कंपन्या आपला आयपीओ खुला करणार असून यामधून जवळपास 5,700 कोटी रुपये उभे केले जाणार असल्याची माहिती आहे. नायका 5,400 कोटी रुपये आणि फिनो पेमेन्ट्स बँक 300 कोटी रुपये उभारण्याचे संकेत आहेत. चालू महिन्यातील आयपीओ आले असून यामध्ये काही आयपीओ लिस्ट झाले असून यात बिर्ला म्युच्युअल फंड आणि दुसऱया बाजूला डिफेन्सच्या समभागाचा समावेश राहिला आहे.
फिनो पेमेन्ट्सचा आयपीओ हा 29 ऑक्टोबर रोजी खुला होणार आहे. तर 2 नोव्हेंबर रोजी तो बंद होणार असल्याची माहिती आहे. सदरचे समभाग स्टॉक एक्सचेंजवर 12 नोव्हेंबर रोजी लिस्ट होणार आहेत. 31 मार्च 2021 पर्यंत कंपनीचा एकूण महसूल 791 कोटी रुपये होता. ज्यामध्ये कंपनीला 20.4 कोटी रुपयाचा फायदा झाल्याची नोंद आहे.
ब्यूटी आणि वेलनेसची सेवा देणाऱया नायका कंपनीचा आयपीओ हा येत्या 28 ऑक्टोबर रोजी खुला होणार असून तो 1 नोव्हेंबर रोजी बंद होणार असल्याची माहिती आहे. कंपनी 1 हजार रुपयाच्या मूल्यावर आयपीओ आणण्याचे संकेत आहेत. एकंदर इश्यू 2,340 कोटी रुपये राहणार आहे.
नायकाचा महसूल हा मार्च2021 रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात 2,440.89 कोटी रुपये होता. एक वर्षाच्या तुलनेत यात 38 टक्क्यांची वाढ झाल्याची नोंद आहे









