प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये चांगले गुण, हुशारी, बुध्दीमत्ता लाभली आहे. आज विद्यार्थ्यांचे शिक्षक, पालक प्रत्येकजण कल्पकतेने नवी पिढी घडविण्याचे काम करत आहेत. यावेळेस तर नवोदय’च्या प्रवेशासाठी जि.प.ने एक पाउल पुढे टाकून जिल्ह्यायातील जास्तीत जास्त विद्यार्थी पुढे आणले आहेत. त्यामुळे मुलांना लहानपणापासूनच घडवा, त्यांच्या भावी करियर चे आकर्षण लहानपणापासूनच जागवण्याचे पयत्न करा, असे पतिपादन जि.प.अध्यक्ष विकांत जाधव यांनी केले.
जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत दिल्या गेलेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण गुरूवारी जि.प.अध्यक्ष विकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. हा कार्यकम येथील लोकनेते कै. शामराव पेजे सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी जि.प.उपाध्यक्ष उदय बने, सीईओ डॉ. इंदुराणी जाखड, सभापती चंद्रकांत मणचेकर, परशुराम कदम, भारती सरवणकर, रेश्मा झगडे, माजी सभापती महेश उर्फ बाबू म्हाप, सदस्य गोपाळ उर्फ आबा आडिवरेकर, शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, डाएटचे पाचार्य गजानन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.








