मुंबई/प्रतिनिधी
मुंबई ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Drugs Case) अभिनेता शाहरुख खानचा (shahrukh khan) मुलगा आर्यन खान (aryan khan) सध्या जेलमध्ये आहे. याच प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीचं नाव समोर येत आहे. अभिनेता चंकी पांडेची (chunky pandey) मुलगी अनन्या पांडे हिच्या घरी एनसीबीने छापे टाकले असून ती आता चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे.
दरम्यान, एनसीबीचे पथक मुंबईच्या वांद्रे येथील बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या (ananya pandey) घरी सकाळी पोहोचले होते. या प्रकरणात अजून फारशी माहिती समोर आलेली नाही, पण असे मानले जाते की एनसीबीचा (NCB) हा तपास आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित असू शकतो. अनन्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची मैत्रीण आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहिम राबवण्यात येत आहे. एनसीबीने घरी जाऊन मोबाईल, लॅपटॉप जप्त केला, तर चौकशीसाठी हजर राहण्यासाठी अनन्या पांडेला समन्स बजावला.
अनन्या चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली असून तिची चौकशीही एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हेच करणार आहेत. आर्यन खानच्या चौकशीची जबाबदारीही वानखेडेंकडेच (sameer wankhede) होते. अनन्यासोबत तिचे वडील अभिनेता चंकी पांडेदेखील कार्यालयात पोहोचले आहेत. या चौकशीदरम्यान आपण संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं चंकी तसंच अनन्याच्या परिवाराने सांगितलं आहे. गरजेची सर्व माहिती आपण एनसीबीला पुरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.