उपमुख्यमंञी बाबू आजगावकर , गोवा फारवर्डचे नेते तथा आमदार विजय सरदेसाई यांनी घेतले भगवती देवीचे दर्शन

प्रतिनिधी /पेडणे
पेडणेच्या प्रसिद्ध पुनवेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपमुख्यमंञी बाबू आजगावकर , गोवा फा?रवर्डचे नेते तथा आमदार विजय सरदेसाई तसेच विधानसभेसाठी इच्छुक उमेदृवारांनी घेतले श्री देवी भगवतीचे दर्शन , रवळनाथ तसेच तंरगाचे दर्शन.
पेडणेच्या पुनवेला हजारोच्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते. राञी उपमुख्यमंञी बाबू आजगावकर , गोवा फारवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी स्वपत्नकि श्री भगवती देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सोबत मांदे मतदारसंघाचे गोवा फारवर्डचे नेते दीपक कळंगुटकर, माजी उपनगराध्यक्ष उपेंद्र देसशप्रभू, माजी उपनगराध्यक्ष प्रशांत गडेकर, सुशांत घोडगे, श्रीधर शेणवी देसाई, राजमोहन शेटय़ आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंञी बाबू आजगावकर यांच्या सोबत यावेळी नगराध्यक्ष उषा नागवेकर ,उपनगराध्यक्ष मनोज हरमलकर, नगरसेवक सिद्धेश पेडणेकर , विष्णू साळगावकर, राखी कशालकर , तृप्ती सावळ देसाई, माधव शेणवी देसाई ,विश्वनाथ तिरोडकर , रामा सावळ देसाई आदी उपस्थित होते.









