28 व्या वार्षिक सभेत नव्या नावाची घोषणा होण्याचे संकेत – नवी ओळख देण्यावर भर
नवी दिल्ली
मार्क झुकरबर्ग हे आपल्या फेसबुक कंपनीचे नाव बदलण्याच्या तयारीत आहेत. द वर्जच्या अहवालानुसार झुकरबर्ग असे नाव देणार आहेत जे मेटावर्स कंपनीवर कपंनीचे लक्ष केंद्रीत करण्यात सहाय्यभूत ठरणार आहे. फेसबुकचे नाव बदलण्यावर येत्या 28 ऑक्टोबर रोजी कंपनीच्या वार्षिक सभेत ते भाष्य करण्याचे संकेत प्राप्त अहवालानुसार समोर येत आहे. नाव बदलण्याच्या मागे फेसबुकचा वेगळा प्लॅन असून ते स्वतःची ओळख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या क्षेत्रात बनविण्याचा प्रयत्न करणार आहेत, असे सांगितले जात आहे.
फेसबुकचे ध्येय अल्फाबेट इंकसारखी होल्डिंग कंपनी बनण्याचे आहे. ज्याच्याजवळ व्हॉटसऍप, इंस्टाग्राम, मॅसेंजर, ओकुलस आदीची मालकी आहे. झुकरबर्ग यांनी जुलैमध्ये म्हटले होते, की फेसबुकचे भविष्य ‘मेटावर्स’मध्ये आहे. त्यानुसार कंपनीची वाटचाल करण्याची त्यांची योजना आहे. फेसबुक, सिलकॉनव्हॅलीची पहिली अशी कंपनी नाही जी आपले नाव बदलत आहे. या अगोदरही अनेक कंपन्यांनी आपली मूळं नावं बदलत नवीन नावे धारण केली असून आजच्या घडीला तेच ब्रँड जगप्रसिद्ध ठरले असल्याचे पहावयास मिळाले आहे.
मेटावर्स काय आहे?
याला व्हर्चुअल रियलटीची नेक्स्ट लेव्हल म्हटले जाते. यात ऑडिओ स्पीकर, टेलीव्हीजन, व्हीडिओ गेमसाठी व्हर्चुअल रियल्टी टेक्नालॉजी डेव्हलप केली जाते. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या समोर नसणार परंतु त्या आपल्याला पहाता येणार आहेत. हीच टेक्नॉलॉजी भविष्यात येणार असून यावर फेसबुक विचार करत असल्याची माहिती आहे.
अशाच काही प्रसिद्ध कंपन्यांची जुनी नावे पुढील प्रमाणे
गुगल – जुने नाव बॅक ड़ टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगल जेव्हा सादर करण्यात आली तेव्हा तिचे नाव बॅकरब असे होते. ही कंपनी लॅरी पेज आणि सर्जे बिन यांनी सुरु केली होती. नंतरच्या काळात या कंपनीचे नाव गुगल करण्यात आले. गुगल हे नाव स्पेलिंगमधील चुकीच्या अर्थामधून समोर आले आणि आज ते जगप्रसिद्ध ठरले आहे.
इंस्टाग्राम – जुने नाव बरबन – इंस्टाग्राम आता फेसबुकची कंपनी आहे, परंतु जेव्हा फेसबुकसोबत हातमिळवणी केली नव्हती तेव्हा या कंपनीचे नाव बरबन(ँल्rंह) असे होते. हे नाव याचे संस्थापक केविन सिस्ट्रोम आणि माइक क्रिगर यांनी दिले होते. बरबनला आयफोन ग्राहकांसाठी लोकेशन शेअरिंग, चेक इन्स करत पाँईट्स अर्न करणे आणि इव्हेटनंतर फोटो शेअर करण्यासाठी यांचे सादरीकरण केले होते. अनेक वेळा फ्लॉप ठरणाऱया ऍपमध्ये बदल करण्यात आले.
झोमॅटो – जुनं नाव फूडीबे – 2010 मध्ये झोमॅटोला फूडीबे या नावाने एक फूड डायरेक्टरी वेबसाईटच्या पातळीवर लाँच करण्यात आले होते. आगामी काळात कंपनीला मिळणाऱया यशासोबत दोन वर्षानंतर फूडीबेचे नाव बदलून झोमॅटो करण्यात आले. हीच कंपनी बदलेल्या नावासोबत फूडडिलिव्हरीमधील पहिली आयपीओ आणणारी कंपनी ठरली आहे.
ऍमेझॉन – जुने नाव कॅडेब्रा इंक -जुलै 1994 मध्ये जेफ बेजॉस यांनी ऍमेझॉनला कॅडेब्रा इंक च्या स्वरुपात सुरु केले होते. काही महिन्यानंतर याचे नाव बदलून ऍमेझॉन डॉट कॉम करण्यात आले होते.
टिंडर -जुने नाव मॅचबॉक्स – टिंडर ला डेटिंग वर्ल्डमध्ये बदलून ऍपच्या पातळीवर आणले आहे. याचे जुने नाव हे मॅचबॉक्स होते. परंतु हे मॅच डॉट कॉम सोबत मिळते जुळते होते. यामुळे संस्थापकांनी मॅचबॉक्स असे नाव असल्याने पुन्हा विचार करुन टिंडर हे नाव देण्यात आले आहे.
पेप्सी – जुनं नाव ब्रॅड्स ड्रिंक – कॅलेब ब्रॅडहॅम यांनी 1893 मध्ये जेव्हा आपल्या नॉर्थ कॅरोलिना ड्रग स्टोअरमध्ये एका फिजी ड्रिंकला इंट्रोडय़ूस केले होते. तेव्हा त्यांनी यांचे नाव सरनेमसह ब्रँड्स ड्रिंक ठेवले होते. परंतु पाच वर्षानंतर 1898 मध्ये ब्रँड्स ड्रिंक नवान बदलून पेप्सी कोला असे ठेवण्यात आले. तर 1961 रोजी हे नाव पेप्सी बनले आहे. याच ब्रँडने या उद्योगांत अनेक विक्रम करत आपले नाव ठेवले आहे.
सोनी- जुनं नाव Tokyo Tsushin Kogyo– सोनीची सुरुवात Tokyo Tsushin Kogyoया नावानी 1946 मध्ये करण्यात आली होती. एक रिपेअरींग करणारा शॉप होता. तो 1955 मध्ये जपानच्या पहिल्या ट्रांजिस्टर रेडिओ केला. 1960 मध्ये Tokyo Tsushin Kogyoयायांनी जगातील पहिली ट्रांजिस्टर टीव्ही दिला. हेच नाव बदलून 1958 मध्ये सोनी कॉर्पोरेशन करण्यात आले. जे जगातील प्रसिद्ध ब्रँडमध्ये समावेश झालेले आहे.









