सांगली : प्रतिनिधी
पूरग्रस्त नागरिक, व्यापाऱ्यांना मिळालेली मदत तुटपुंजी आहे. मुख्यमंत्र्यांनी यामध्ये वैयक्तिक लक्ष घालावे. फेर पंचनामे करावेत. भरीव मदत दयावी अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली. पूरग्रस्तांना भरीव मदत मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराही गाडगीळ यांनी यावेळी बोलताना दिला.
पूरग्रस्तांना २०१९ प्रमाणे मदत मिळावी यासाठी भाजपच्या वतीने सांगलीत निदर्शने करण्यात आली. यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, माजी आमदार दिनकर पाटील, प्रदेश सदस्य शेखर इनामदार, प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, मुन्ना कुरणे, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, भाजपा गटनेते विनायक सिहासने, माजी स्थायी समिती सभापती पांडूरंग कोरे, सभापती सुब्राव मद्रासी, नगरसेविका स्वाती शिंदे यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पूरग्रस्त नागरिकांना भरीव मदत न मिळाल्यास मिळालेली मदत मुख्यमंत्र्यांना व्यापारी व नागरिक परत करतील, असा इशाराही आमदार गाडगीळ यांनी यावेळी बोलताना दिला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत लवकरच पुरग्रस्तांचा मेळावा घेणार असल्याचेही माजी आमदार नितीन शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
Previous Articleएकरकमी फायनल, आता प्लस किती?
Next Article एकरकमी एफआरपी हवी, दमडी कमी घेणार नाही – राजू शेट्टी








