प्रतिनिधी / सातारा :
जिल्हा बँक निवडणुकीचा अर्ज स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी सोसायटी गटातून ॲड. उदयसिंह उंडाळकर यांनी आपला अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांच्याकडे सादर केला. दुपारी 3 वाजेपर्यंत 18 जणांनी 55 अर्ज नेले होते. एक अर्ज 100 रुपयांना असून मतदारांनाच फक्त अर्ज दिला जात आहे. निवडणूक अर्ज स्वीकारण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दुसऱ्या मजल्यावर सुरु आहे. याच अनुषंगाने नेत्यांची वर्दळ सुरु झालेली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पहिला अर्ज ॲड. उदयसिंह उंडाळकर यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थित दाखल केला. 25 पर्यंत अर्ज स्वीकारण्याची तारीख आहे. 26 रोजी छाननी असून अर्ज मागे घेण्याची तारीख दि. 10 नोव्हेंबरपर्यंत आहे. 11 रोजी सकाळी 11 वाजता चिन्ह वाटप होणार आहे. 21 रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकारण्यास सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली. दुपारी 3 वाजेपर्यंत 18 जणांनी 55 अर्ज नेले तर एकच अर्ज दाखल झाला.